Saturday, October 14, 2017

कुणी माणूस देता का रे ? माणूस ?

 दिवशी मी दिवसभर भटकंती करून रात्रीला लंडन वरून घरी यायला निघालो. नेहमी सारखं पळत पळत स्टेशन गाठलं आणि तिथे जाऊन कळलं की   ट्रेन delay झालीये . सगळी लोके फलाटावरील बाकावरती बसून डिस्प्ले होणाऱ्या बोर्ड कडे टक लावून प्लॅटफॉर्म नंबर दिसण्याची वाट पाहत बसलेली होती, सगळी लोक रोजचीच, कामासाठी रोज ये-जा करणारी वाटत होती, सगळ्यांचे चेहरे थकलेले दिसत होते.  प्लॅटफॉर्म  नंबर डिस्प्ले झाला आणि सगळी  मंडळी लागलीच ट्रेन गाठन्यासाठी धुम ठोकली.  मला भारतातील ट्रेनमधील general  बोगीत जागा पकडत असल्याचा भास झाला, "घरोघरी मातीच्या चुली " अस मनात बोलून, स्वतःशी हसून एकमेकांना face करनारी सीट बळकावली , भारतातील अनुभव इथे कामी आला अस म्हणायला काही हरकत नाहीये. सोबतीला असलेले हेडफोन्स खिश्यातुन काढुन कानात खुपसले आणि गाणी एकायला सुरवात केली.  बाकीच्या लोकांची जागेकरिता चालू असलेली शर्यत पाहू लागलो, जसे जसे लोक settle होत होती, तशी तशी ती माझ्या सारखीच  मोबाइल / technical  उपकरण  हाती घेऊन technology च्या जगात पोहचत होती.

सहज डोक्यात विचार शिवशिवला खरंच माणूस हरवला का ? तेवढ्यात नावाजल्या मूवी मधील संवाद आठवला "कुणी घर देता का  रे ? घर .... " आणि  माझ्या मनात संवाद उमटला

"कुणी माणूस देता का रे ? माणूस ?
एका माणसाला कोणी माणूस देता का ?" ..... स्वतःवर हसून मी परत माझ्या मोबाइलमध्ये डोके खुपसलं.

एव्हाना आमची ट्रेन Slough  पोहचली आणि ट्रेन खाली होऊन आपण UK  मधेच आहोत हे कन्फर्म झाल.  माझ्या बाजूला जागा खाली झाली ये हे पाहून त्या जागेला बळकावण्या साठी लोक कूच करू लागली, याच गडबडी मध्ये एका आजीचा आवाज ऐकू आला
 "Don’t Touch it. I will manage it. I don’t need your help !”.
एक drunk मुलगा आजीला help करण्याचा प्रयत्न  करत होता आणि ती त्याच्यावर ओरडत होती. शेवटी आजीबाईनी माझ्या बाजूला खाली झालेली  जागा पटकावली. त्या आजी कडे एक जुन्या काळातील गिटार / वोइलिन container, एक कापडी  झोरा आणि काही बुक्स अशी मालमत्ता होती.  त्या पूर्ण ट्रेन मध्ये नजर फिरवली तर मला एकच वक्ती दिसत होती जिच्या कडे टेकनिकल उपकरण दिसत नव्हतं ती म्हणजे आजी .  थोड्या वेळात आम्ही नेक्स्ट स्टेशन ला पोहचलो आणि माझ्या पुढील पण जागा खाली झाली, तर आजीबाईला space मिळावी म्हणून मी पुढील सीट वर जाऊंन बसावें.  कानातील हेडफोन्स काढून आजीबाईला म्हणालो, 

I will move to next seat so that you will get the space to keep your belongings”
 असा बोलून नेक्स्ट सीट ला मी जाऊन बसलो . माझ्या कानामध्ये हेडफोन नाहीये पाहून आजीबाई बोलली

 "Thank You,  That young guy was trying to help me but he should first ask me that can I help you, I yelled at him because he was trying to touch the 70-year-old violin, I don’t like it. But still I want to say sorry to him, but he moved somewhere else.".
आणि अश्या प्रकारे आजीबाईनी  गोष्टीतील सुरवात केली  आणि त्या ७० वर्ष जुन्या violin ची कहाणी साताउत्तरे नवेच तर कश्या प्रकारे  ती violin  वाजवायला शिकली ते सुध्दा सांगितल. 

सकाळ पासुन कोणीतरी आपल्याशी बोलत ये तेव्हा मला वाटलं या गर्दी मध्ये पण अजून माणूस आहे. तो हरवला नाही ये, त्याला शोधायला तुम्हाला फक्त technology ला बाजूला ठेऊन तुमच्या समोर बसलेल्या वक्ती सोबत बोलायला हव. जर अस नाही झाला तर माणूस लुप्त होऊन जाईल आणि उरेल फक्त एक त्रांतिक माणूस !

"कुणी माणूस देता का रे ? माणूस ?
एका माणसाला कोणी माणूस देता का ?
एक माणूस टेकनॉलॉजि वाचून,
मोबाइल वाचुन ,
व्हाट्सअँप च्या ग्रीटिंग वाचून,
फेसबुक च्या टॅग्स वाचून...
डोंगरा डोंगरात हिंडत आहे.
जिथे कोणी तरी भेटेल,
याची आशा करत ये ..
कोणी माणूस देता का रे ? माणूस ?"
या टेकनॉलॉजिच्या जगात माणूस शोधतो ये  मी,
 माणूस हवाय मला माणुस,
 कुठे हरवला का हो हा माणूस ?
काही टेकनॉलॉजि आहे का हो माणूस शोधायला ?
कोणी माणूस देता का रे ? माणूस ?"


P.S.  हे सगळं मी  टेकनॉलॉजि चा वापर करूनच लिहीत ये / share  करत ये .

Monday, April 2, 2012

******दुष्काळी भोलानाथ******

******दुष्काळी भोलानाथ******

सांग सांग भोलानाथ थेंबभर पाणी भेटेल का ?
पाण्यावाचून माझा जीव वाचेल का ?
भोलानाथऽऽऽऽ भोलानाथऽऽऽऽ

सांग सांग भोलानाथ
उदया अहे chemistry चा पेपर
NACL AND HCL पासुन पाणी मिळेल का ?
भोलानाथऽऽऽऽ भोलानाथऽऽऽऽ

सांग सांग भोलानाथ.............
दुपारी रखवालदार झोपेल का ?
पाणी चोरुन णतांना वाज होइल का ?
भोलानाथऽऽऽऽ भोलानाथऽऽऽऽ

भोलानाथ भोलानाथ
खर सांग एकदा
ठवडयात नळ येतील का तीनदा ?
सांग सांग भोलानाथ............

-Ankush S. Kawalkar
02.04.2012


Thursday, April 21, 2011

Do you want to know about new invention in web , internet , mobile then you must have to visit this page

http://askfilescren.blogspot.com/p/ktech.html


For getting new information follow us on http://www.askfilescren.blogspot.com

Sunday, March 27, 2011

Engineering की जय हो ...........


Rock the Engineering
                                                   बे एके बे , बे दुणे चारबे त्रीक सहा ………. हा पाढा सगळ्यांनाच माहिती आहे व जोengineering ला येतो त्याला तर हमखाच माहिती असतो……कारण त्यावरच तर त्याचे अख्खे आयुष्य अवलंबून असतं. Engineering लहान मुलापासुन तर मोठ्या माणसापर्यंन्त माहिती असलेला शब्दहा आठ अक्षरी शब्द असला तरी त्याची किंमत ही दिवंसेदिवस लाखोच्या घरातून करोडोच्या घरात जाऊन पोहचलेली आहे .
 भारतीय संस्कृतीमध्ये Doctor ला alternate पर्याय म्हणुन engineer या शब्दाकडे पाहिल्या जाते .हा शब्द तुम्हाला भारतीय शब्दकोशाशिवाय कुठेही सापडणार नाही आणि जर तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा अंश सुद्धा कोठेही मिळणार नाही…..आणि हो engineering मध्ये पर्याय ही अनेक ?? तुम्हाला कोणते engineerव्हायचे , ते माहित नसले तरी चालेल . कारण अहो आपण कुठलाही engineer  व्हायला तयार ना ? मनासारखी branch मिळाली नाही ,म्हणुन आम्ही रडत बसत नाही , जी मिळाली ती आम्हचीच branch . हा पण college and university मात्र पाहतो ,  बर कां ? university आणि college सही मिळालं ना ? मग branch कुठलीही असो आम्हाला काही फरक पडत नाही , पहिले college and university महत्ताची बसकारण colleges नुसार packages ठरतात ना ??? आणि टमक्या टमक्या collegeमध्ये तुम्हाला टमकी टमकी company job offer करायला येते ना ??  on the spot , campus through तुमच selection होत ना , मग जाँब मिळण्याशी मतलब ..that’s it …
तुमची branch गेली उडत… तुम्हाला काय व्हायचय याच्याशी काही संबंध नाही . तुम्ही जर मुलगा असाल तर engineer  होणार आणि मुलगी असाल तर , doctor होणार आणि त्यामध्ये बोबडी वळली की मग engineering ला दंडवत घालणारच …म्हणजे येऊन जाऊन आपण सगळे engineer चं.
ठीक आहे तर , तुम्ही engineer मग होणार , आता engineering चा अभ्यास करतायं म्हणजे engineer नाही तर काय चाकर होणार आहे??? Engineer  झाला तरी त्याला पण पोटापाण्याचा प्रश्न हा असणारच , अहो तो पण सगळ्यांसारखा माणुसच आहे की??? पोटापाण्यासाठी नोकरी शोधणार ….हा ती पण foreign company मध्ये आधी शोधणार आणि नंतर काहीच हातात नाही मिळाल तर भारतीय company चा हात धरणारकारण foreign company  मध्ये नोकरी मिळाली तर आपला status वाढतो ना . आम्ही foreign company मध्येच job  शोधणार , बरे का ? आणि महिन्याकाठी गलेगठ्ठ पगार  घेणार …sorry ,sorry  वर्षभरासाठी भारी package  मिळवणार आणि भारत सरकारने offer केलेल्या  Britishanchi चाकरी करतच राहणार
 भारत सरकारनं offer केलेल्या British company ची चाकरी करताना प्रत्येक वेळी स्वतःला गुलामासारखं विकाएक कंपनी सोडुन दुसरी join करा आणि हजारो कागदप्रत्राच गाठोळं जमा करा . आणि ज्या कंपनीत job करायचयं आहे तेथे नेऊन ते आपटा….आणि स्वताःला गहाण टाका. Job सोडायचा म्हणजे पुन्हा ते गाठोळ एका सावकारापासुन सोडवून पुन्हा दुसऱ्या सावकाराकडे स्वताःला गहाण ठेवण्यासाठी सुपुर्द करा , एवढच आपलं काम . engineering मध्ये computer वाले डोळ्यांनी रडणार , तर civil वाले ऊनात तडपणार ,EN&TC वाले digital signal मध्ये अडकणार ,IT वाल्यांना virusखाणार आणि mechanical वाल्यांची डोके मशिनरी उडवणार या सगळ्यातलं काहीच नाही जमलं तर , मग दोन पर्याय . पहिला :- एक तर घरी बसुन डोके दाबत बसणार किंवा दुसरा :- चुल्लुभर पाण्यात जाऊन जीव देणार . आपण दुसराच पर्याय निवडणार , कारण घरच्यांचे बोलणे खाण्यासाठी आपला जन्म हा झालेलाच नाही !!!!
“ ऊठ नालायका , नऊ वाजले college ला जायच नाही का ????......... ” या आवाजात मला माझ्या mobile ने इशारा दिला आणि मस्तपैकी सुरु असलेल्या भाषणाच्या स्वप्न सभेतुन बाहेर पडलो आणि विचार करायला लागलो ’ तो तावा तावाने भाषण ठोकणारा माणूस कोण होता ?........ ’ पुन्हा mobile ने त्याच शब्दांचा ऊच्चार करुन आमचा उद्धार केला  मग काही एक विचार नं करता college च्या तयारीला लागलो …..तरी पण सरते शेवटी एक प्रश्न उद्भवतो “ माझ्या स्वप्नातला engineering चा उद्धार करणारा तो माणुस कोण होता ??? ”………. जाऊ द्या यार तुम्ही पण आपल्या डोक्याचं दही करु नका आणि मी पण करत नाही कारण…….
“Doctor होऊन दुसऱ्याच्या जीवावर जगल्यापेक्षा,
वकील होऊन दुसऱ्याच्या भांडणावर स्वताःची पोळी भाजल्यापेक्षा,
 Engineer होऊन स्वताःच्या पायावर धोंडा मारलेला काय वाईट ?” 
Ankush S. Kawalkar.
F.E. F (comp)
@$k.files.cren
www.askfilescren.blogspot.com

Sunday, March 6, 2011

लाखोल्या


लाखोल्या 

एका दिवसाची आहे ही गोष्ट,
झाल्यात आमच्या मँडम रुष्ट,
आत्ता काय विचारता रागवण्याची गोष्ट.
मुलांच्या कानाने घेतले ऎकण्याचे कष्ट.

काय तर म्हणे, “तुम्ही अभ्यासु नाही,
तुमच्यात विद्यार्थीपणा सोडा, माणुसकीही सुद्धा नाही.
तुमच्याशी बोलायच राहलय का काही.”
अशा आम्हाला अनेक लाखोल्या वाही.

मुलांच्या दिमाखाच होत होत दही,
मँडम चेक करत होत्या आमची वही,
मुले करत होती , बुक्स complete काही,
अन मनातल्या मनात ते पण लाखोल्या वाही.

मुले म्हणत होती ,रोजचीच आहे हि कटकट,
मँडम त्यांच्याकडे पाहत होती मटमट,
Presenty साठी करत होती खटपट,
बेल वाजली अन सगळे पळाले पटपट.