Saturday, October 14, 2017

कुणी माणूस देता का रे ? माणूस ?

 दिवशी मी दिवसभर भटकंती करून रात्रीला लंडन वरून घरी यायला निघालो. नेहमी सारखं पळत पळत स्टेशन गाठलं आणि तिथे जाऊन कळलं की   ट्रेन delay झालीये . सगळी लोके फलाटावरील बाकावरती बसून डिस्प्ले होणाऱ्या बोर्ड कडे टक लावून प्लॅटफॉर्म नंबर दिसण्याची वाट पाहत बसलेली होती, सगळी लोक रोजचीच, कामासाठी रोज ये-जा करणारी वाटत होती, सगळ्यांचे चेहरे थकलेले दिसत होते.  प्लॅटफॉर्म  नंबर डिस्प्ले झाला आणि सगळी  मंडळी लागलीच ट्रेन गाठन्यासाठी धुम ठोकली.  मला भारतातील ट्रेनमधील general  बोगीत जागा पकडत असल्याचा भास झाला, "घरोघरी मातीच्या चुली " अस मनात बोलून, स्वतःशी हसून एकमेकांना face करनारी सीट बळकावली , भारतातील अनुभव इथे कामी आला अस म्हणायला काही हरकत नाहीये. सोबतीला असलेले हेडफोन्स खिश्यातुन काढुन कानात खुपसले आणि गाणी एकायला सुरवात केली.  बाकीच्या लोकांची जागेकरिता चालू असलेली शर्यत पाहू लागलो, जसे जसे लोक settle होत होती, तशी तशी ती माझ्या सारखीच  मोबाइल / technical  उपकरण  हाती घेऊन technology च्या जगात पोहचत होती.

सहज डोक्यात विचार शिवशिवला खरंच माणूस हरवला का ? तेवढ्यात नावाजल्या मूवी मधील संवाद आठवला "कुणी घर देता का  रे ? घर .... " आणि  माझ्या मनात संवाद उमटला

"कुणी माणूस देता का रे ? माणूस ?
एका माणसाला कोणी माणूस देता का ?" ..... स्वतःवर हसून मी परत माझ्या मोबाइलमध्ये डोके खुपसलं.

एव्हाना आमची ट्रेन Slough  पोहचली आणि ट्रेन खाली होऊन आपण UK  मधेच आहोत हे कन्फर्म झाल.  माझ्या बाजूला जागा खाली झाली ये हे पाहून त्या जागेला बळकावण्या साठी लोक कूच करू लागली, याच गडबडी मध्ये एका आजीचा आवाज ऐकू आला
 "Don’t Touch it. I will manage it. I don’t need your help !”.
एक drunk मुलगा आजीला help करण्याचा प्रयत्न  करत होता आणि ती त्याच्यावर ओरडत होती. शेवटी आजीबाईनी माझ्या बाजूला खाली झालेली  जागा पटकावली. त्या आजी कडे एक जुन्या काळातील गिटार / वोइलिन container, एक कापडी  झोरा आणि काही बुक्स अशी मालमत्ता होती.  त्या पूर्ण ट्रेन मध्ये नजर फिरवली तर मला एकच वक्ती दिसत होती जिच्या कडे टेकनिकल उपकरण दिसत नव्हतं ती म्हणजे आजी .  थोड्या वेळात आम्ही नेक्स्ट स्टेशन ला पोहचलो आणि माझ्या पुढील पण जागा खाली झाली, तर आजीबाईला space मिळावी म्हणून मी पुढील सीट वर जाऊंन बसावें.  कानातील हेडफोन्स काढून आजीबाईला म्हणालो, 

I will move to next seat so that you will get the space to keep your belongings”
 असा बोलून नेक्स्ट सीट ला मी जाऊन बसलो . माझ्या कानामध्ये हेडफोन नाहीये पाहून आजीबाई बोलली

 "Thank You,  That young guy was trying to help me but he should first ask me that can I help you, I yelled at him because he was trying to touch the 70-year-old violin, I don’t like it. But still I want to say sorry to him, but he moved somewhere else.".
आणि अश्या प्रकारे आजीबाईनी  गोष्टीतील सुरवात केली  आणि त्या ७० वर्ष जुन्या violin ची कहाणी साताउत्तरे नवेच तर कश्या प्रकारे  ती violin  वाजवायला शिकली ते सुध्दा सांगितल. 

सकाळ पासुन कोणीतरी आपल्याशी बोलत ये तेव्हा मला वाटलं या गर्दी मध्ये पण अजून माणूस आहे. तो हरवला नाही ये, त्याला शोधायला तुम्हाला फक्त technology ला बाजूला ठेऊन तुमच्या समोर बसलेल्या वक्ती सोबत बोलायला हव. जर अस नाही झाला तर माणूस लुप्त होऊन जाईल आणि उरेल फक्त एक त्रांतिक माणूस !

"कुणी माणूस देता का रे ? माणूस ?
एका माणसाला कोणी माणूस देता का ?
एक माणूस टेकनॉलॉजि वाचून,
मोबाइल वाचुन ,
व्हाट्सअँप च्या ग्रीटिंग वाचून,
फेसबुक च्या टॅग्स वाचून...
डोंगरा डोंगरात हिंडत आहे.
जिथे कोणी तरी भेटेल,
याची आशा करत ये ..
कोणी माणूस देता का रे ? माणूस ?"
या टेकनॉलॉजिच्या जगात माणूस शोधतो ये  मी,
 माणूस हवाय मला माणुस,
 कुठे हरवला का हो हा माणूस ?
काही टेकनॉलॉजि आहे का हो माणूस शोधायला ?
कोणी माणूस देता का रे ? माणूस ?"


P.S.  हे सगळं मी  टेकनॉलॉजि चा वापर करूनच लिहीत ये / share  करत ये .