Sunday, March 6, 2011

लाखोल्या


लाखोल्या 

एका दिवसाची आहे ही गोष्ट,
झाल्यात आमच्या मँडम रुष्ट,
आत्ता काय विचारता रागवण्याची गोष्ट.
मुलांच्या कानाने घेतले ऎकण्याचे कष्ट.

काय तर म्हणे, “तुम्ही अभ्यासु नाही,
तुमच्यात विद्यार्थीपणा सोडा, माणुसकीही सुद्धा नाही.
तुमच्याशी बोलायच राहलय का काही.”
अशा आम्हाला अनेक लाखोल्या वाही.

मुलांच्या दिमाखाच होत होत दही,
मँडम चेक करत होत्या आमची वही,
मुले करत होती , बुक्स complete काही,
अन मनातल्या मनात ते पण लाखोल्या वाही.

मुले म्हणत होती ,रोजचीच आहे हि कटकट,
मँडम त्यांच्याकडे पाहत होती मटमट,
Presenty साठी करत होती खटपट,
बेल वाजली अन सगळे पळाले पटपट.